रवीश कुमारच्या पत्रकारितेची जरब सत्तेमध्ये असणाऱ्या प्रत्येकाला वाटते!
दबावापुढे रवीश कुमार झुकला नाही. ‘आली अंगावर तर घे शिंगावर’ या म्हणीप्रमाणे त्याने सगळ्यांचा सामना केला आणि त्याच्या ‘प्राईम टाईम’ शोवर त्याने विरोधाचा, मतभेदाचा, प्रतिकाराचा व निर्भय अभिव्यक्तीचा विचारमंच म्हणून काम करणे चालू ठेवले. आजच्या संकटाच्या काळात रवीश कुमारने संघर्ष आणि अवज्ञाच्या गोष्टी सांगणे थांबवले नाही. आजच्या काळात तो शक्तिहीन, दुर्बलांचे हत्यार बनला आहे .......